Uddhav Tahckeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Group : उद्धव ठाकरे 16 जानेवारीला करणार त्या प्रकरणाची चिरफाड; महाराष्ट्राच्या जनतेला निमंत्रण

Uddhav Thackeray Press Conference On January 16th : उद्धव ठाकरेंच्या 16 जानेवारीच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष...

Bhagyashree Pradhan

Thackeray Group vs Shine Group :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संपूर्ण दिवसभर कल्याण लोकसभा मतदरासंघातील शाखांना भेटी दिल्या. या भेटी केवळ शाखांसाठी होत्या. मात्र त्या ठिकाणी हजारो लोक जमा झाल्याने त्याला सभेचे स्वरूप आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची बांधणी बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे. आम्ही काही दिवसांत येथून उमेदवार जाहीर करू, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मूळ शिवसेनेकडेच परत येईल, असे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर, देशातही तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे Sanjay Raut म्हणाले.

उद्धव ठाकरेंची महत्त्वाची पत्रकार परिषद...

विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीनिःपक्ष असते. परंतु या ठिकाणी राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले आहे. यासंदर्भात 16 तारखेला उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या संपूर्ण प्रकारात प्रकरणाची चिरफाड जनतेच्या उद्धव ठाकरे हे न्यायालयात करणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.

आम्ही या ठिकाणी जनतेला बोलावले आहे. देशाच्या इतिहासातील खुली पत्रकार परिषद या ठिकाणी होणार असल्याचे ते म्हणाले. स्वतःचा पक्ष उभा करायची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मिलिंद देवरा पदासाठी जात आहेत त्यांनी खुशाल जावं'

यावेळी त्यांनी मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले. मिलिंद देवरा जात आहेत त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. हा महाराष्ट्र आहे. जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी जात असेल तर, खुशाल जावे. अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत. दोन वेळा ते निवडून आले आहेत. त्यामुळे अरविंद सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असेल तर, त्यामध्ये चुकीचे काय? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे, असे संजय राऊत म्हणाले.

'शंकराचार्यांचा अपमान हा हिंदू धर्माचा अपमान'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर भाष्य केले. ते अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक धर्माला धर्म प्रमुख असतात आणि आमच्या धर्माचे धर्मप्रमुख शंकराचार्य आहेत. मंदिर अपूर्ण असताना जर प्राणप्रतिष्ठा होणे चुकीचे असेल तर, त्यात ते गैर काय सांगत आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. शंकराचार्य हे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांचा अपमान केला आहे. हा केवळ शंकराचार्य यांचा अपमान नसून संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT