Mumbai Political News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिला दौरा कल्याण आणि आजूबाजूच्या जवळपास सहा विधानसभा मतदारसंघात शनिवारी झाला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे चिरंजीव, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंवर सडकून टीका केली. लोकसभेत कल्याणमधील कचारा साफ करणार, असा निशाणाच ठाकरेंनी शिंदे पिता-पुत्रावर साधला. यास मुख्यमंत्री शिंदेंनी सडेतोड प्रत्युतर दिले.
मुख्यमंत्री शिंदेंच्या शासकिय निवासस्थानी काँग्रेसचे नेते, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी देवरा यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच त्यांच्या कामाचे कोतुक करत देवरांसारख्या काम करणाऱ्या शिलेदाराची शिवसेनेला गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून केलेल्या कचरा साफसफाईचा हिशोबही चुकता करण्यास शिंदे विसरले नाहीत.
उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले...
महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मंत्र्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराची साफसफाई केली. त्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केले. 'त्यांना कल्याणमध्ये असलेल्या अंबरनाथ शिव मंदिरात, शेजारील नाल्यातील अस्वच्छता दिसली नाही. साफसफाई करायची असेल तर त्यांनी अंबरनाथ नाल्याची करावी. आता निवडणुकीत त्यांनी केलेला कचरा आपल्याला साफ करायचा आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कामाला लागा,' असा इशारा ठाकरेंनी दिला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिंदेंचा पलटवार
कल्याणमधील कचरा साफसफाईच्या ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) चोख उत्तर दिले. ते म्हणाले, 'आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. हाडाचे कार्यकर्ते असल्याने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाटेल ते करू. काल कल्याणमध्ये त्यांनी कचरा साफ करण्याची भाषा केली. मात्र जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्यांना ते कसे साफ करतील. जनता तर घरात बसणाऱ्यांचा साफ करते,' असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.