Thackeray Brother Voting Sarkarnama
मुंबई

Thackeray Brother Voting News : ठाकरे बंधूंनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा हक्क ! मतदान केल्यानंतर म्हणाले..,

Maharashtra Lok Sabha Election 2024 : देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी नागरिक बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावित आहेत, उद्धव ठाकरेंचा दावा तर नवमतदार, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने मतदान करतील, राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास..

Chaitanya Machale

Mumbai news : महाराष्ट्रातील 13 मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकांचे मतदान सोमवारी पार पडत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह नाशिक, धुळे, दिंडोरी, भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेले चित्र पहायला मिळत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी कुटूंबियांसह जाऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला. या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या कुटूंबिनयांनी सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला. ठाकरे बंधूंनी सकाळी घराबाहेर पडत आपले मतदान केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या 48 जागांसाठी गेल्या काही दिवसांमध्ये मतदान होत आहे. सोमवारी 13 जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत प्रामुख्याने अनेक मतदारसंघात होत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू झाले आहे. यावेळी विविध मान्यवरांनी मतदान केंद्रांवर जाऊन आपला हक्क बजाविला. वांद्रात शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून प्रसिद्ध विधीज्ञ उज्ज्वल निकम निवडणूक लढत आहेत.

मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी नागरिक बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावित आहेत. मतदार जुमलेबाजांना कंटाळले आहेत. त्यामुळे पैशाचा पाऊस मतदार स्वीकारणार नाहीत,असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे म्हणाले, संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे.आम्ही देशासाठी मतदान केले आहे. मतदान केंद्रांवर काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय. मतदारांना सावली मिळावी यासाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी. अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा आहेत, मतदार बाहेर पडतील आणि मतदान करतील.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी आपले निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवरून मतदान केंद्रापर्यंत चालत जात मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, नवमतदार, तरूण, तरूणी मोठ्या संख्येने मतदान करतील असा माझा विश्वास आहे. आताच मतदानाला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. संध्याकाळपर्यंत मतदान सुरू राहणार असल्याने अधिकाधिक नागरिक बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. पण ज्यांनी आशाच सोडल्यात त्यांचे मात्र काही सांगता येत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT