Shantigiri Maharaj Latest News : शांतिगिरी महाराजांनी मतदान यंत्राला घातला फुलांचा हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Nashik Lok Sabha Election 2024 Voting LIVE : शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह अन्य भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदानाविषयी माहिती घेतली. मतदारांना शुभेच्छा दिल्या.
Shantigiri Maharaj
Shantigiri MaharajSarkarnama

Nashik Loksabha Election News 2024 : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा आहेत. दिंडोरी मतदारसंघात मतदानासाठी विशेष उत्साह दिसून आला. दोन्ही मतदारसंघात सकाळी नऊ पर्यंत सहा टक्के मतदान झाले आहे.

आज सकाळी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान यंत्राला हार घातला, यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले. शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह अन्य भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदानाविषयी माहिती घेतली. मतदारांना शुभेच्छा दिल्या.

सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीत नाशिक मतदारसंघात 6.45 टक्के मतदान झाले. यामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 7.7 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे सिन्नरचे आहेत. नाशिक पूर्व 6.45 टक्के, नाशिक मध्य 7.12 टक्के, नाशिक पश्चिम 6.28 टक्के, देवळाली 5.3 टक्के, इगतपुरी 5.68 टक्के.

Shantigiri Maharaj
Ravindra Waikar News : माझ्यासाठी ठाकरे कधी आलेच नाहीत, मी एकटाच लढलो, मीच नेता, मीच शिवसैनिक; वायकरांनी व्यक्त केली खदखद..

दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha Election) मतदारसंघात पहिल्या दोन तासात 6.3 टक्के मतदान झाले. यामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे, नांदगाव 6.51 टक्के, कळवण 3.05 टक्के, चांदवड 8.8 टक्के, येवला 6.4 टक्के, निफाड 6.5 टक्के आणि दिंडोरी 7.5 टक्के.

दिंडोरी मतदारसंघात विविध केंद्रांवर मतदारांमध्ये अतिशय चांगला उत्साह पाहायला मिळाला. विशेषत: शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडला आहे. दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर मतदारांना सहाय्य करीत होते. या मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत असल्याने पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

Shantigiri Maharaj
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, संजय राऊतांना कॉन्फिडन्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com