Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ; दसरा मेळाव्याआधीच आतषबाजी होणार

Shiv Sena : रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार का हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आज (बुधवारी) पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज प्रथमच गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर गटप्रमुखांना एकत्रितपणे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे संवाद साधणार आहेत. मुंबईतल्या गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता नेस्को मैदानात ठाकरे भाषण करणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यंदा शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही .त्यामुळेही आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.

उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत…

या मेळाव्यात ठाकरे हे कुणाचा समाचार घेणार,ते नेमकं काय बोलणार, शिंदे गटाच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याकडे सर्वांचं राज्याचे लक्ष लागलं आहे. गोरेगाव तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत… असं यावर लिहिलंय.

कदमांच्या टीकेला काय उत्तर देणार..

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कदम यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार का हे पाहावे लागणार आहे. गृहमंत्री अमित शहा हे काही दिवसापूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आव्हानावर काय भाष्य करणार का ? हे आज सांयकाळी समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT