Uddhav Thackeray and Ajmer Sharif Dargah Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray and Ajmer Sharif Dargah : अजमेर शरीफ दर्गाबाबत वाद सुरु असताना उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर!

Shivsena UBT and Ajmer Sharif Dargah : ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813वा उरूस ; ठाकरेंचे विरोधक हा मुद्दा उचलून धरण्याची चिन्हं!

Mayur Ratnaparkhe

DUddhav Thackeray sent Chadar to Ajmer Sharif Dargah : अजमेर दर्गा शरीफच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींचा 813वा उरूस लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी चादर पाठवली. ही चादर खादिम सय्यद जिशान चिश्ती यांना सोपवली गेली.

उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थाहून अजमेर शरीफमध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाहच्या 813व्या उरुसानिमित्त चादर चढवण्यास पाठवली गेली. याप्रसंगी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, उपनेते नितीन नांदगावकर, मुजफ्फर पावस्कर, कमलेश नवले, नौमान पावस्कर आणि उपशाखा प्रमुख गणेश माने यांची उपस्थिती होती.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी चादर अशावेळी पाठवली आहे, जेव्हा अजमेर दर्गामध्ये शिव मंदिर असल्याच्या दाव्यावरून वाद कोर्टानत पोहचला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गासाठी चादर पाठवण्यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधू शकतात. तर भाजपही(BJP) मुंबई महापालिकेच्या तोंडावर या मुद्दा उचलून धरू शकते.

राजस्थानमधील अजमेर दर्गामध्ये मंदिर असल्याच्या दाव्यावरून शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सिव्हिल कोर्टात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्ता आणि दुसऱ्या पक्षांच्या विकालांचा युक्तिवाद ऐकून निकालाची पुढील तारीख 24 जानेवारी दिली आहे.

अजमेर सिव्हिल कोर्टाने अल्पसंख्याक मंत्रालय, दरगाह कमेटी अजमेर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास(एएसआय) नोटीस पाठवली आहे. कोर्टात आणखी पाच जणांनी स्वत:ला पक्षकार बनवण्यासाठी अर्ज केला आहे. याचसोबत दर्गाकमिटीचे वकील अशोक माथुर यांनी याचिका रद्द करण्यास अर्ज केला. तर विष्णु गुप्ता आणि अंजुमन कमेटीच्या विकालांनी आपली आपली बाजू मांडली.

दरगाह दिवानचे पुत्र नसीरुद्दीन चिश्ती हेही कोर्टात पोहचले. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही ख्वाजा साहब यांचे वंशज आहे. आम्हालाही पक्षकार बनवलं गेलं पाहिजे होतं. आम्ही कोर्टात आमची बाजू मांडली आणि पक्षकार बनण्यासाठी अर्ज केला. तर अजमेर दर्गामध्ये मंदिर असल्याचा दावा करणारे विष्णु गुप्ता यांनी म्हटले की, कोर्टात वर्शिप अॅक्टबाबत फार चर्चा झाली होती, ज्यामध्ये आमचे वकील वरूण कुमार सिन्हा यांनी म्हटले की दर्गा वर्शिप अॅक्टमध्ये येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT