Mumbai News : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर मंगळवारी 'सिल्वर ओक'वर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.या दोन नेत्यांमध्ये झालेल्या भेटीवरून विविध चर्चांना उधाण आले आहे.यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हे देखील होते तर 'सिल्वर ओक'वर जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन नेत्यांमध्ये जवळपास ४५ मिनिटे बैठक सुरू होती. मंगळवारी झालेली बैठक ही कौटुंबिक स्वरुपाची होती. यामध्ये दोन्ही नेत्यांत राजकीय विषयावर राजकीय चर्चा झाली नाही. राजकीय बैठक नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते, असे या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर इंडिया (INDIA Alliance) आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या बैठकीत यावर चर्चा होईल, असा सर्व राजकीय धुरिणांना वाटत होते. त्याशिवाय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागल्याने त्यावर या बैठकीत चर्चा झाली, असावा अंदाज काही जणांनी व्यक्त केला असला तरी यावर चर्चा झाली नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अदानी यांना लक्ष्य केले होते. त्याशिवाय धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाकडे गेले आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) हे त्याविषयी समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे यावेळी याच विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेमकी या बैठकीत काय चर्चा झाली असावी, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.