India Alliance News : 'इंडिया' आघाडातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीबाबत काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. 'इंडिया' आघाडीत काही राज्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं शरद पवार यांनी जाहीरपणे म्हटलं होतं. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांनीही 'इंडिया' आघाडी निष्क्रीय असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर काँग्रेस सतर्क झाली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोन केला. खर्गे यांनी नितीशकुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर 'इंडिया' आघाडीने ठरवलेल्या अजेंड्यानुसार प्राधान्याने काम केले जाईल, अशी ग्वाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांना दिली.
काय म्हणाले होते शरद पवार?
इंडिया आघाडीतसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काही मुद्द्यांवर मतभिन्नता आहे. सर्वांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, लोकसभेसाठी जेवढं शक्य आहे, तेवढं विधानसभा निवडणुकीसाठी सोपं नाही, असे सांगून शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवले.
नितीशकुमार यांनी व्यक्त केली होती नाराजी
देशातील विरोधी पक्षांची एकजूट करण्यात व्यग्र असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीची कोणतीही बैठक अथवा चर्चा झाली नाही. याचं कारण म्हणजे आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्यग्र आहे. आणि विरोधी आघाडीला पुढे नेण्याची त्यांना कुठलीही चिंता नसल्याचं नितीशकुमार यांनी बोलून दाखवलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.