Shivsena kalyan Dombivali .jpg Sarkarnama
मुंबई

Shivsena News: 'हिंदी सक्ती'चा निर्णय मागे घेताच शिवसैनिकांनी फडणवीस सरकारला दाखवली 'ठाकरे ब्रँड'ची ताकद

Kalyan Dombivali Political News : कल्याण आणि डोंबिवली शहरात 'ठाकरे बंधू आता एकत्र येण्याच्या हालचाली' अधिक गती घेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे पक्षाच्या या पोस्टर मोहिमेमुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan Dombivali News : गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रात सत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं होतं. या वादात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करताच सरकार अलर्ट झालं. सरकारने मोर्चाआधीच हिंदी भाषा सक्तीबाबतचे दोन्हीही निर्णय रद्द केले.त्यामुळे ठाकरे बंधूंचा मोर्चाही रद्द करण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनीच शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय सरकारने रद्द केल्याने मोर्चाही रद्द झाला असला तरी येत्या 5 जुलैला विजयी मेळावा मनसे आणि शिवसेनेकडून घेण्यात येणार आहे.

याचदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या एकीचे शक्तिप्रदर्शन बॅनरबाजीतून करण्यात आले आहे. ठाकरे केवळ नाव नाही, ती ताकद जी सरकारला ही झुकवतो असा मजकूर त्यावर लिहिण्यात आले आहे.

इयत्ता पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषा शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शासनाच्या या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला. राज्यभर विविध स्तरातून याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलैला राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर करत शिवसैनिकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठी बांधवांना पक्षभेद बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळेल असे बोलले जात असतानाच राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याणमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीची बॅनर बाजी करण्यात आली आहे. यामागे ठाकरेंची ताकद अधोरेखित करण्याचा उद्देश होता. हे बॅनर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हात मिळवल्याचा फोटो झळकावण्यात आला आहे.

ठाकरे ब्रँडचा धसका घेतला, ठाकरे हे केवळ नाव नाही, ती ताकद जी सरकारलाही झुकवते !" असा ठळक मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख संदीप पंडित आणि विभाग प्रमुख रोहन पोवार यांनी लावला आहे. यामुळे 'ठाकरे बंधू आता एकत्र येण्याच्या हालचाली' अधिक गती घेत असल्याची चर्चा कल्याण आणि डोंबिवली शहरात रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे पक्षाच्या या पोस्टर मोहिमेमुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT