Rajan Vichare Sarkarnama
मुंबई

Thane Shiv Sena Politics : ठाकरेंचे खासदार येताच ध्वनिक्षेपकावर लागले 'भेटला विठ्ठल माझा...'; शक्तिस्थळावर काय घडले?

Anand Dighe Jayanti Uddhav Thackeray Shiv Sena Group pays Tribute In Thane : ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी जाताच ठाण्यात काय घडलं?

Pankaj Rodekar

Uddhav Thackeray Shiv Sena Group Thane News :

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील खारकर आळी येथील 'शक्तिस्थळावर' त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत दाखल झाले. यावेळी Anand Dighe यांचे शिष्य असलेले खासदार राजन विचारे आणि दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे असंख्य शिवसैनिकांसह गुरूच्या स्मृतींना अभिवादन करताना भेटला विठ्ठल माझा... या गाण्याला सुरुवात झाली. हा एक गुरू-शिष्य भेटीदरम्यानचा योगायोग समजावा लागणार आहे.

27 जानेवारी रोजी दिवंगत दिघे यांची जयंती असल्याने ठाणे-पालघर जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ठाण्यातील खारकर आळी येथे येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 12.30 वाजता येणार असल्याने या परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्री येण्यापूर्वी ठाकरे गटाचे शिवसैनिक शक्तिस्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले.

अमर रहे ... अमर रहे... दिघेसाहेब ... अमर रहे या घोषणा देत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने अभिवादन करीत होते. त्याचवेळी शिंदे गटाच्या आयोजित कार्यक्रमाच्या स्थळी लावलेल्या ध्वनिक्षेपकावर 'धर्मवीर' या चित्रपटातील भेटला विठ्ठल माझा... भेटला विठ्ठल... हे गाणे वाजण्यास सुरुवात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे शिवसैनिक दिवंगत दिघे यांना अभिवादन करताना लागलेले हे गाणे हा निव्वळ योगायोग म्हणावा लागणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गुरू-शिष्याच्या भेटीचा योग यावेळी पाहण्यास मिळाला. जसे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तेथून गेल्यावर हे गाणेही संपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT