Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Group : ठाकरेंचा निष्ठावंत माजी आमदार राजकीय अज्ञातवासात? कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज

Uddhav Thackeray Shiv Sena Group Former Mla Subhash Bhoir : उद्धव ठाकरेंचा उद्या दौरा, पण निष्ठावंत नेत्याची भूमिका गुलदस्त्यात...

Bhagyashree Pradhan

Uddhav Thackeray To Visit Kalyan Dombivali :

उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय आहे? यासंदर्भातील कुजबुज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येत आहे. गेल्या सहा महिन्यांत भोईर यांनी एकही राजकीय भाष्य केलेले नाही. त्यामुळे भोईर सध्या राजकीय अज्ञातवासात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना फुटली मात्र, भोईर ठाकरे गटात

शिवसेना फुटली आणि शिंदे 16 आमदारांसह बाहेर पडले. त्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेले. मात्र कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.

सह महिन्यांत राजकीय भाष्य नाही

गेल्या सहा महिन्यांपासून माजी आमदार सुभाष भोईर यांनी कोणतेही राजकीय भाष्य केलेले नाही. गुरुवारी सायंकाळी आमदार निधीतून नांदिवली येथे बांधलेल्या चौकाचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी सरकरनामाच्या प्रतिनिधींनी त्यांना पात्र अपात्र आमदार या विषयावर बोलण्यासाठी प्रश्न विचारला. मात्र यावेळी त्यांनी या प्रश्नावर राजकीय भाष्य करणे टाळले. सध्या ते कुठल्याही राजकीय प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळत असल्याची चर्चा ठाकरे गटातील कार्यकर्ते करत आहेत.

उद्धव ठाकरे भोईर यांची भेट घेणार का?

उद्धव ठाकरे उद्या कल्याण डोंबिवली येथे आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. यावेळी माजी आमदार सुभाष भोईर येथे असणार का किंवा उद्धव ठाकरे सुभाष भोईर यांची भेट घेणार का? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

अखंड हरिनाम सप्ताहात हजेरी

अखंड हरिनाम सप्ताहाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते. या अखंड हरिनाम सप्ताहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वागताध्यक्ष होते. या कार्यक्रमात भोईर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी भोईर हे वारकरी असल्याने त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती, अशी चर्चा रंगली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत सुभाष भोईर?

2014 ते 2019 या काळात भोईर हे कल्याण ग्रामीणचे आमदार होते. इतकेच नव्हे तर, आमदार सुभाष भोईर यांची ओळख ठाकरे गटाचे निष्ठावान नेते म्हणून आहे. सुभाष भोईर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. त्यानंतर 2020 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती. त्यांनी तशी सर्व तयारीही केली होती. अंगणात मंडप टाकला होता. मात्र आयत्यावेळी ठाण्याहून उमेदवारीची सूत्रे बदलली आणि रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले. माजी आमदार भोईर यांना हा सर्वात मोठा धक्का होता. ठाण्यातील वरिष्ठ पातळीवरील एका नेत्यामुळे तिकीट कापले गेले, अशी चर्चा त्यावेळी रंगली आणि एकच गोंधळ झाला. त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव झाला आणि मनसेचे राजू पाटील आमदार झाले. मात्र यानंतर ही सल भोईर यांच्या मनात कायम राहिली.

एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर भोईर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. मात्र अलिकडे भोईर यांच्याकडून राजकीय भाष्य केले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भोईर हे नेमका काय निर्णय घेणार आणि कल्याणमध्ये राजकीय भूकंप होणार का? याची कुजबुज सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT