PM Modi in Mumbai : दिघा स्टेशनच्या उद्घाटनात ठाकरेंच्या खासदाराचा पत्ता कट

MP Rajan Vichare Angry : ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना उद्घाटनाच्या काही तास अगोदर आमंत्रण...
Narendra Modi, Rajan Vichare
Narendra Modi, Rajan VichareSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) शासकीय मुंबई (Mumbai) दौरा राजकीय दौरा झाल्याची टीका होत आहे. मुंबईत शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या उद्घाटनाला (Mumbai Trans Harbour Link Inauguration) स्थानिक आमदार-खासदारांना आमंत्रण न दिल्याचे समोर आल्यानंतर आता ठाण्यातही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे-ऐरोलीदरम्यान दिघा रेल्वे स्टेशनमधून शुक्रवारी लोकल धावली. पंतप्रधानांनी ज्या अनेक उपक्रमांचे उद्घाटन केले, त्यात दिघा रेल्वे स्टेशनचाही समावेश होता. पण या उद्घाटनासाठी ठाण्याचे स्थानिक खासदार राजन विचारे यांना आमंत्रणपत्रिका नव्हती. उद्घाटनापूर्वी काही तास अगोदर राजन विचारे यांना उद्घाटनपत्रिका पाठवण्यात आली खरी, पण लोकार्पण निमंत्रणपत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे हा कार्यक्रम राज्य सरकारचा की पक्षाचा, असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

Narendra Modi, Rajan Vichare
Atal Setu News : अटल सेतूच्या उद्घाटन मंचाला राजकीय लागण?

लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या सरकारला आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल, असा इशारा यावेळी राजन विचारे यांनी दिला. त्याचवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची ही विकृती असल्याची कडवट टीकाही त्यांनी केली.

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे-ऐरोलीदरम्यान उभारलेल्या दिघा गाव रेल्वे स्टेशन (Digha Railway Station) आणि बेलापूर ते पेंधर मेट्रो सुरू झाली आहे. अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा किळसवाणा प्रकार या सरकारने केल्याचे आरोप खासदार विचारे यांनी केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्प तडीस नेला. आता त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रणपत्रिकेत नाव टाकण्याचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दिघा स्टेशनात भाजप-ठाकरे गटात जुंपली

या सर्व पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे ढोल-ताशा पथक घेऊन दिघा स्टेशनमध्ये गेले. तिथे पोलिसांनी त्यांना ढोल-ताशा वाजवण्यास मनाई केल्यामुळे त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही आले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधत घोषणाबाजी सुरू झाली. भाजपकडून 'मोदी-मोदी' तर शिवसेनेकडून 'ठाकरे-ठाकरे' घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमपत्रिकेतील विशेष उपस्थितांची नावे

कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत निमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपिल पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्या नावांचा समावेश आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Narendra Modi, Rajan Vichare
Atal Setu News : अटलसेतूच्या उद्घाटनासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीचं लक्ष्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com