Uddhav Thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. उद्धव ठाकरेंना 65 जागांवर समाधान मानावे लागले. तर, मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या आहेत.
निकालानंतरच्या आकडेवारेनुसार उद्धव ठाकरेंचे 14 उमेदवार हे फार कमी मतांच्या अंतराने पराजित झाले अन्यथा त्यांना 79 जागा मिळाल्या असता. आणि ते मनसे आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेच्या जवळ गेले असते.
प्रभाग क्रमांक 179 मधील ठाकरेंच्या उमेदवार दीपाली खेडकर यांचा अवघ्या 503 मतांनी पराभव झाला. तर, तर, प्रभाग 19 मधील त्यांच्याच उमेदवार लीना गुढेकर यांना 876 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
मनसे 50 पेक्षा अधिक जागांवर लढली मात्र त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मनसेनी देखील 20 पेक्षा अधिक जागांवर विजयाचा झेंडा रोवला असता तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा महापौर बसला असता.
उद्धव ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांमध्ये चार उमेदवारांच्या पराभवाचे अंतर हे 500 मतांपेक्षा देखील कमी आहे. तर, 11 उमेदवारांच्या पराभवातील अंतर हे 1 हजार मतांपेक्षा कमी आहेत.
उमेदवार पराभवातील अंतर
वैशाली पाटणकर 121
दीपाली खेडकर 503
देवेंद्र आंबेकर 538
सतीश पवार 569
लीना गुढेकर 876
सौरभ घोसाळकर 797
शिल्पा भोसले 781
सुधीर खातू 769
सुप्रिया गाडगीळ 934
स्मिता गावकर 935
हर्षदा पाटील 943
प्रसाद आयरे 1 हजार 82
प्रमोद शिंदे 1 हजार 91
प्रणिता निकम 1 हजार 22
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.