Uddhav Thackeray addressing party workers during Shiv Sena’s ‘Nirdhar Melava’ in Mumbai, announcing youth-centric strategy for upcoming BMC elections. Sarkarama
मुंबई

BMC Election 2025 : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी 'या' नगरसेवकांचा पत्ता कट करणार

Shivsena UBT New Strategy For BMC Election 2025 : महापालिका निवडणुकीसाठी अद्याप ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठका सुरू असून विविध वार्डातील दोन्ही पक्षांची ताकद पाहून जागावाटप केलं जाणार आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेत 84 जागा जिंकल्या होत्या.

Jagdish Patil

Mumbai News, 29 Oct : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती आखायला सुरूवात केली आहे. नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत निर्धार मेळावा पार पडला.

यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत भाजप मुंबई गिळायला आला आहात पण आम्ही तुमचं पोट फाडून बाहेर येऊ, असा इशारा दिला. मुंबई महापालिका पहिल्यापासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिला आहे.

तर काहीही करून मुंबई ताब्यात घ्यायचीच असं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या माहितीनुसार ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. तरूण उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, ज्येष्ठ नगरसेवक नाराज होऊन ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची नाराजी ठाकरे दूर करण्यासाठी काय करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसली तरी त्यांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार दिला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अद्याप ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठका सुरू असून विविध वार्डातील दोन्ही पक्षांची ताकद पाहून जागा वाटप केलं जाणार आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेत 84 जागा जिंकल्या होत्या. परंतू त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यामुळे या नगरसेवकांच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवे उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत. मात्र, हे उमेदवार 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नसणार आहेत. ठाकरेंच्या या निर्णयाचा फायदा होणार का? हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. परंतू महापालिकेसाठी अखेर उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT