Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने महिला पदाधिकार्‍याला मारहाण, जीवे मारण्याचीही धमकी!

BJP Youth Wing President Threat Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष समोर आलेला असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाने टोळक्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 Oct : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष समोर आलेला असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाने टोळक्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी) यांच्यासह अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशा एकूण आठ जणांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे २ वाजता त्या एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथील बंगल्याजवळ गेल्या होत्या.

BJP
NCP News : अजित पवार काँग्रेसचा अख्खा मतदारसंघच रिकामा करणार : एकाच वेळी दोन दिग्गज माजी मंत्र्यांना धक्का

तेथे संशयितांनी "आमचा दादा अनुप मोरे इथे आहे, तू इथे कशाला आलीस? तुला मारून टाकू. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला संपवायचे सांगितले आहे. गाडीने उडवून अपघात घडवू. तुला बदनाम करून जगणे कठीण करू. अनुप मोरे आमचा बाप आहे, तो आम्हाला वाचवेल," अशा शब्दांत धमकावले. यामुळे घाबरलेल्या महिलेने बंगल्यात परत जाण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी एका व्यक्तीने कारने त्या महिलेला सोडण्यासाठी येताच, अनेक महिलांनी गाडीला घेराव घातला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलांना अनिता तिपाले आणि एकविरा खान यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. ठाण्यातून बाहेर पडताच पुन्हा शंभरहून अधिक जणांच्या जमावाने "तुला ठार मारू," अशी धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

BJP
Omraje Nimbalkar Vs Ranajgajitsinh Patil: एकमेकांची 'लायकी' काढत पुन्हा एकदा भाजप आमदार अन् उद्धव ठाकरेंचा खासदार भिडला

पोलिसांची चूक सुधारली

महिलेच्या जबाबात आठ नावे होती, पण प्राथमिक FIR मध्ये अनुप मोरे यांचे नाव वगळले गेले. याबाबत विचारणा केल्यावर पोलिसांनी "अनावधानाने नाव राहिले," असे सांगून नंतर त्यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट केले. तर, मी कोणत्याही महिलेला धमकी दिलेली नाही. माझ्यावर खोटे आरोप लावून राजकीय सूडबुद्धीने मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं अनुप मोरेंनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com