Sushma Andhare Sanjay Shirsat Eknath Shinde .jpg Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare On Shinde:शिंदेंची गुप्त 'दिल्लीवारी'; शिरसाटांना नोटीस; अंधारे म्हणाल्या,...आयकर विभागाचा 'धोका' मोठा!

Sanjay Shirsat Notice News : संजय शिरसाट यांनी गुरुवारी (ता.10 जुलै) त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचं विधान केलं.यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना जोर चढला.

Deepak Kulkarni

Mumbai News : छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाटांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. आता याच शिरसाटांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची कबुली त्यांनीच एका कार्यक्रमात दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. याचवरुन सुषमा अंधारे यांनी मनात एकनाथ शिंदेंच्या अचानकच्या दिल्ली दौऱ्यामागे आयकर विभागाच्या नोटिशीचा तर संदर्भ तर नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकली आहे.

सुषमा अंधारे यांनी यानंतर टायमिंग साधत थेट उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) टार्गेट केलं आहे. त्यात ते म्हणतात, सरडा धोका बघून रंग बदलतो, माणूस मोका बघून रंग बदलतो. पण मोक्यापेक्षा आयकर विभागाचा धोका मोठा असल्याचा चिमटा अंधारे यांनी काढला आहे.

संजय शिरसाट यांनी गुरुवारी(ता.10 जुलै) त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचं विधान केलं. यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना जोर चढला.

पण त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आणि आपण अडचणीत येतोय हे लक्षात येताच शिरसाटांनी आपल्या विधानावरुन बघता बघत यू टर्न घेतला. शिंदेंचं नाव आपण चुकून घेतल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. याचदरम्यान,एकनाथ शिंदे यांनी गोपनीयरित्या दिल्ली दौरा आटोपत तिथे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतल्याची चर्चा आहे. शिंदेंचा दिल्ली दौरा आणि मंत्री शिरसाटांची नोटिशीबाबत माहिती याचवरुन अंधारेंनी हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे ट्विटमध्ये काय म्हणाल्या..?

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ट्विटमध्ये म्हणतात,रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढ्याच फरक आहे. सरडा "धोका" बघून रंग बदलतो..माणूस "मोका" बघून रंग बदलतो असल्याचा जिव्हारी लागणारा घाव घातला. तसेच पुढे त्यांनी पण गुरुपौर्णिमेचा "मोका" असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटिशीचा "धोका" त्यापेक्षा मोठा आहे..!! दिघेसाहेब बघताय ना..? असं अंधारेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT