Uddhav Thackeray slams Bhayyaji Joshi sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Video: 'हा संघाचा छुपा अजेंडा, अनाजी पंत...', उद्धव ठाकरे भय्याजी जोशींवर कडाडले

Uddhav Thackeray slams Bhayyaji Joshi RSS: मराठी माणूस दयाशील आहे, सहृदयी आहे. म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं, अशी ही पद्धत आहे. भाजपला वाटते मराठी माणूस आम्हाला मतं देणारच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Roshan More

Uddhav Thackeray News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी मुंबईत अनेक भाषा आहेत, मुंबईची एक भाषा नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत राहणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केलं.

या वक्तव्यानंतर विधानसभेत देखील गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून स्पष्टीकरण दिलं. मात्र, पत्रकारांशी बोलातना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत भैय्याजी जोशी यांना सुनावलं.

'काल या काळातील अनाजी पंत मराठी-अमराठी असे विष कालवून गेला.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब, औरंगजेबाला मदत करणारे अनाजी पंत मात्र या जन्माला येतायेत यासारखे दुर्देव असू शकत नाही.', असा संताप ठाकरेंनी भय्याजी जोशी यांच्यावर व्यक्त केला.

'त्यांनी येऊन घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे असे नाही, असे म्हणत द्वेषाचे गोमुत्र शिंपडले. याचा अर्थ असा हा संघाचा छुपा अजेंडा आहे. भाजपचा, RSS agenda छुपा अजेंडा आहे. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. आत्ता जर तुम्ही बघितले असेल तर हिंदुस्तान-पाकिस्तान हा विषय काढत नाही.', असा टोला ठाकरेंनी लगावला

'आत्ता हिंदुस्थान पाकिस्तान करत नाहीत तर बटेंगे तो कटेंगे करतात. बटेंगे तो कटेंग म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम नाही तर मराठी-अमराठी, मराठीतही मराठे-मराठेत्तर अशी वाटणी करून राज्य बळकवायचे. जे अनाजीपंत आले होते त्यांनी मी आव्हान देतोय, अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये, तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल येथे करून दाखवावी. फक्त भाषा करून दाखवावीच नाही तर तेथून सुखरुप येऊनही दाखवावे.', असे आव्हान देखील ठाकरेंनी भैय्याजी जोशी यांना केला.

मराठी माणसाला गृहीत धरतात

'मराठी माणूस दयाशील आहे, सहृदयी आहे. म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं, अशी ही पद्धत आहे. म्हणून मराठी माणसाला खिजगणित धरत नाहीत. भाजपला वाटते मराठी माणूस आम्हाला मतं देणारच आहे. भाषावर राज्यांची रचना झाली आत्ता हे मुंबईची भाषावार गल्ली रचना करता की काय? तोडा फोडा आणि राज्य करा ही विकृत मानसिका या निमित्ताने पुढे आली आहे.', असे देखील ठाकरे यांनी म्हटले.

राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री काल विधानसभेत बोलले की कोरटकर, कोरटकर काय करताय? तो चिल्लर माणूस आहे. मग आत्ता मुख्यमंत्र्यांनी बोलावं भैय्याजी भैय्याजी काय करताय? जोशी हा चिल्लर माणूस आहे. नाही तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांनी कारवाई करावी नाही तर हे पाप त्यांनी मान्य करावं.'

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT