Mumbai News, 06 Feb : "मुंबई येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे", असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी केलं आहे.
जोशी यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवाय त्यांचं हे वक्तव्य हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
तर भय्याजी जोशी यांच्या संदर्भात राज्य सरकारने विधानसभेत निंदा ठराव आणून धिक्कार करावा अशी मागणी देखील राऊतांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "भय्याजी जोशी यांच्याबाबत विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा अन्यथा तुम्ही मराठी आईचं दूध पिलेलं नसून तुमच्या दूधात भेसळ आहे.
तुमच्या जन्मात भेसळ आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना हे कदापी सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खळवलं आहे, असं म्हणत राऊतांनी जोशींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. शिवाय कोरटकर सोलापूरकरप्रमाणे भाजप (BJP) भैयाजी यांना सोडणार, हे कौरव आहेत, असंही राऊत म्हणाले.
तर मुंबईची भाषा मराठी नाही असं भाजपचे प्रमुख नेते मुंबईत (Mumbai) येऊन सांगतात आणि हे राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं? मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठी मीडियाने याकडे कसं दुर्लक्ष केलं? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.
दरम्यान, भय्याजी जोशी यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. ते तामिळनाडूत आणि चेन्नईत जाऊन असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, मराठी येण्याची गरज नाही, मराठी आमची राजभाषा आहे आणि राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे, असंही राऊत म्हणाले.
भैय्याजी जोशी म्हणाले, "मुंबईची कुठलीही अशी एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे मराठी भाषा बोलणारे जास्त लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.