Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मुंबई उत्तर - पूर्व मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपला कुठेही गेलो नाही, असे सांगितले. तसेच अरविंद सावंत यांचा त्यांच्याशी संपर्का झाला असता आपण दिल्लीतील बैठकीला येणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या दिवशी देखील विमान पकडत असल्याचे ते पक्षातील नेत्यांना सांगत होते. मात्र, अखेर ते बैठकीला हजर राहिलेच नाहीत.
संजय पाटील हे फुटलेल्या गटासोबत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गट देखील सक्रीय झाला आहे. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत संजय पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महापालिकेत ठाकरेंची सत्ता गमावली असली तरी त्यांचे 60 नगरसवेक निवडणून आले आहे. त्यामुळे संजय पाटील फुटने हे ठाकरेंच्या मुंबईतील वर्चस्वला आव्हान असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आपल गड भक्काम ठेवण्यासाठी संजय पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी रणनीनी आखण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे आज मातोश्रीवर संजय पाटील यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढाव घेणार आहेत. पाटील यांनी साथ सोडल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नेमक्या काय भावना आहे. ते ठाकरे स्वतः जाणून घेत आहेत.
संजय पाटील गेले तरी पक्ष संघटना ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हालचाली सुरु केल्या आहेत. पाटील यांच्यासोबत कोणते पदाधिकारी जाऊ शकतात याचा अंदाज स्थानिक नेत्यांना आला आहे. त्यामुळे पक्षसंघटनेला कमी कमी नुकसान कसे होईल, हे पाहिले जात आहे.
संजय पाटील यांच्या कन्या राजूल पाटील या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरसेविका आहेत. त्या पक्षाने आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे त्या नेमक्या काय भूमिका घेतात याची चर्चा आहे. जर त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर त्या अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.