Uddhav Thackeray Speech Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Speech: कोरोनाची लस मोदींनी काढली; फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंनी उडवली खिल्ली

सरकारनामा ब्यूरो

Shivsena 57th Anniversary: शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी करत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कोरोना लसीच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ दाखवत फडणवीसांची खिल्ली उडवली. या बरोबरच अवली-लवली, असं म्हणत हास्यजत्रेतील एक डायलॉग मारत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन सोहळा पार पडत आहे. शिवसेनेला 57 वर्ष झाले. आपल्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. मात्र, मुंबईच्या एका कोपऱ्यात गारद्यांची गर्दी झालेली आहे", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

"ते (देवेंद्र फडणवीस) म्हणाले की, सुर्यावर थुंकू नका, आरे कोण सुर्य? कुठला सुर्य? तुमचा सुर्य मणिपूरमध्ये का उगवला नाही. तुमचा सुर्य मणिपूरमध्ये का जात नाही. मणिपूरमध्ये सिबियासारखी परिस्थिती झाली आहे", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलं.

फडणवीसांची उडवली खिल्ली

फडणवीस यांनी एका मेळाव्यात बोलताना मोदींनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्यामुळे कोट्यवधी लोक जीवंत असल्याचं म्हटलं होतं. आता यावरून ठाकरे यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले, "आज हस्यजत्रेचा प्रयोग झाला. पण काल फडणवीसांचा एक प्रयोग झाला, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीस यांच्या कोरोना लसीबाबतच्या विधानाचा एक व्हिडिओ भर सभेत ऐकवला. त्या व्हिडिओमध्ये फडणवीस असे म्हणतात की, "मोदीजींनी कोविडची लस तयार केल्यामुळे आपण सगळे येथे येऊ शकलो", असं फडणवीसांचे व्हिडिओतील वक्तव्य ऐकताच मोठा हशा पिकला.

फडणवीस काय म्हणाले होते?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे धाराशीव येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोना लस ही नरेंद्र मोदी यांनी तयार केली, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राज्यभर जोरदार टीका झाली. आज त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना ऐकवला. तसेच फडणवीस यांनी केलेल्या लसीच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT