News Arena India Survey : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला सर्वाधिक १२५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. यात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या राज्यातील सर्वच विभागात भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईतही भाजप १६ ते १८ जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. (Voter support for BJP and Thackeray group in Mumbai)
मुंबई (Mumbai) हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानला जातो. त्याच मुंबईत शिवसेनेतील बंडानंतर भाजप (BJP) एक नंबर जाण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १४ आमदार होते. नव्या सर्वेनुसार ९ ते १० आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेने मुंबईत शिवसेनेचे नुकसान कमीच होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात जादा नुकसान होण्याचा अंदाज न्यूज एरेना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आलेला आहे.
शिवसेनेतून फुटून सवता सुभा निर्माण केलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत अवघ्या दोन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. राज्यात सत्तेत असूनही आणि मुख्यमंत्रीपदी राहूनही शिंदे यांना मुंबईकरांचा कौल अपेक्षित प्रमाणात मिळताना दिसत नाही, त्यामुळे शिंदे गटाचा मुंबईत भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त आहे. तुलनेने ठाण्यात मात्र पाच जागा मिळण्याचा शक्यता या सर्व्हेत वर्तविण्यात आलेली आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकी १६ आमदार निवडून आले होते. या सर्व्हेतही १६ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणजे भाजप मागील निवडणुकीएवढ्या जागा मिळविणार, असा हा सर्व्हे सांगतो. याचाच दुसरा अर्थ भाजपला शिंदे गटाची मते ट्रान्स्फर झाली आहेत. मात्र, भाजपचे मते शिंदे गटाला मिळाली नसल्याचे स्पष्ट होते.
काँग्रेसचा मात्र महाविकास आघाडीमुळे मुंबईत फायदा होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळालेल्या काँग्रेसचे पाच ते सहा आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर हा मतदारसंघ सहज जिंकेल, असेही या सर्व्हेत नमूद करण्यात आलेले आहे. इतरांना एका जागोवर समाधान मानावे लागेल.
ठाण्यात १८ पैकी १५ जागा युती जिंकणार
ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांच्या साथीने भाजप १८ पैकी १५ जागा जिंकण्याची शक्यता या अंदाज व्यक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये भाजप ८ ते १०, तर शिवसेना शिंदे गट पाच जागा जिंकेल, असा शक्यता आहे. तसेच, राष्ट्रवादी २ ते ३ जागा, शिवसेना ठाकरे गट १ ते २ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
Mumbai (36 seats)
BJP : 16-18
SS(UBT) : 9-10
SS : 2
NCP : 1
INC : 5-6
OTH : 1
152. Borivali : BJP (Bastion of BJP since 4 decades).
153. Dahisar : BJP
154. Magathane : SS (Their MLA Surve will sail through due to his loyal voters & support of Gujaratis-North Indians who are around 30% in this constituency).
155. Mulund : BJP (Pro incumbency in favour of sitting MLA Mihir Kotecha)
156. Vikhroli : SSUBT
157. Bhandup West : SSUBT
158. Jogeshwari East : SSUBT (All three seats have high Marathi+Muslim population)
159. Dindoshi : BJP (Demography favours BJP now)
160. Kandivali East : BJP (safest bet)
161. Charkop : BJP (Gujarati stronghold)
162. Goregaon : BJP
163. Malad West : 50:50
164. Versova : SSUBT
165. Andheri West : BJP (Pro incumbency & polarisation)
166. Andheri East : SSUBT
167. Vile Parle : BJP
168. Chandivali : INC
169. Ghatkopar West : BJP
170. Ghatkopar East : BJP
171. Mankhurd Shivaji Nagar : SP
172. Anushakti Nagar : NCP
173. Chembur : INC
174. Kurla : SSUBT
175. Kalina : Tossup
176. Bandra East : INC
177. Bandra West : BJP
178. Dharavi (SC) : INC
179. Sion Koliwada : BJP (Strong candidate)
180. Wadala : BJP ( Candidate is strong & has won 6 terms)
181. Mahim : SSUBT
182. Worli : SSUBT
183. Shivadi : SSUBT
184. Byculla : SS
185. Malabar Hill : BJP
186. Mumbadevi : INC
187. Colaba : BJP (Close contest)
Thane (18 seats)
BJP : 8-10
SS : 5
SSUBT : 1-2
NCP : 2-3
134. Bhiwandi Rural (ST) : SSUBT
135. Shahapura (ST) : NCP
136. Bhiwandi West : Tossup
137. Bhiwandi East : BJP
138. Kalyan West : SS
139. Murbad : BJP(Strong candidate)
140. Ambernath (SC) : SS
141. Ulhasnagar : 50:50
142. Kalyan East : BJP
143. Dombivali : BJP (Popular candidate)
144. Kalyan Rural : SS
145. Mira Bhayandar: BJP
146. Ovala Majiwada : SS
147. Kopri Pachpakhadi : SS
148. Mumbra : NCP
149. Belapur : BJP
150. Airoli : BJP
151. Thane : BJP
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.