Eknath shinde , Uddhav Thackeray
Eknath shinde , Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Thane News : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं सूचक विधान ; म्हणाले.." ठाण्यातील नेत्यांची.."

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज (गुरुवारी) ठाण्यात दौऱ्यावर आहेत. राज्यात सत्तातर झाल्यानंतर ठाकरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. एका आरोग्य शिबिराच्या उद्धघाटनासाठी ते आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. "निष्ठेच्या पांघरुणाखाली शिरलेले लांडगे विकले गेले. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. त्यामुळेच पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा काश्मीरमध्येही घुमल्या," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज मी फक्त आरोग्य शिबिरासाठी आलो आहे.खासदार राजन विचारे यांनी बोलावलं म्हणून आलो. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला येथे आलो. पण, येत्या काही दिवसांत ठाण्यातील राजकीय नेत्यांची आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे,"

"आरोग्य मोठा विषय आहे. राजकारणाच्या घाणीत पाऊल न टाकता शिवसेनाप्रमुखांनी केलेले काम आपण निष्ठेने करत राहिलात," असे कौतुकही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे केले. "ठाण्यामध्ये लवकरच जाहीर सभा घेणार आहे. या सभेत साऱ्यांचा काय तो समाचार घेईन," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

"अस्सल निष्ठावंत शिवसैनिक इकडे आहेत. जे विकाऊ होते ते विकले गेले. ते काय भावाने विकले हे तुम्हाला माहिती आहे. मी सहज गमंत म्हणून सांगतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत काश्मीरमध्ये गेले होते. त्यांनी तिथला एक व्हिडिओ दाखवला. काश्मीरमध्येही पन्नास खोके, एकदम ओके या घोषणा झाल्या. निष्ठेच्या पांघरुणाखाली शिरलेले लांडगे विकले गेले. त्यामुळे ही महाराष्ट्राची बदनामी झाली. मात्र, जे शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिले ते राजकारणात मशाल पेटवतील," असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT