74th Republic Day: देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी (Abdel Fattah Al Sisi) हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाच्या परंपरेनुसार कर्तव्य पथावर राष्ट्रपतींना परमवीर, अशोकचक्र विजेत्यांकडून सलामी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देण्यात आली.
राजपथचे नामकरण ‘कर्तव्य पथ’
१०५ मिमी भारतीय फील्ड गनने ही सलामी देण्यात आली. या फील्ड गनने जुन्या 25 पाउंडर गनची जागा घेतली, जी संरक्षण क्षेत्रातील वाढती ‘आत्मनिर्भरता’ दर्शवते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्यपथाचे देखभाल करणारे कामगार, भाजी विक्रेते, दूध बुथ कामगार, किराणा दुकानदार आणि रिक्षाचालक यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. गेल्या वर्षी राजपथचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा होता.
अग्निवीर पहिल्यांदा परेडमध्ये
यंदा प्रथम लष्कराच्या स्वदेशी २१ तोफांनी सलामी दिली. देशाच्या लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक विविधतेचे अनोखे दर्शन घडले. अग्निवीर पहिल्यांदा परेडमध्ये सामील झाले होते. आयएल३८ या नौदलाच्या विमानाला निरोप देण्यात आला.
महिला रायडर्सही सहभागी
हॉर्स शो, विविध डान्स परफॉर्मन्स, मोटरसायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल, नेव्ही बँड आणि मार्शल आर्ट्सद्वारे भारतीय सशस्त्र दलांनी आपले पराक्रम दाखवले. परेडमध्ये पहिल्या महिला रायडर्सही सहभागी झाल्या होत्या.
503 नर्तक परेड
'नारी शक्ती' ही थीम दाखवणारे 503 नर्तक परेड दरम्यान जल्लोषपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. रायसीना हिल्सवर तरुणांच्या तांत्रिक पराक्रमाचे अचूक सिंक्रोनाइझेशनद्वारे राष्ट्रीय व्यक्तिरेखा आणि घटना दर्शविणारा 3,500 स्वदेशी UAV सह भारत सर्वात मोठा ड्रोन शो झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.