Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बारसूतील आंदोलकांची भेट घेणार; तारीख जाहीर करत सरकारला दिला इशारा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबईतील बीकेसी मैदानात आज (1 मे) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

तसेच येत्या 6 तारखेला बारसू येथे जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलकांची भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत. या प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडत बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात असलेल्या तेथील स्थानिक नागरिकांना भेटणार आहेत. येत्या 6 मे रोजी बारसूत जाऊन तेथील नागरीकांशी बोलणार आहे, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात एक विषय भडकलेला आहे बारसू. बारसूबाबत मी बोलणार नाही तर येत्या 6 तारखेला जाऊन तेथील लोकांना भेटून बोलणार आहे. तुम्ही कसं काय मला अडवू शकता. बारसू काय पाकव्याप्त काश्मीर किंवा बांगलादेश नाही. मी 6 तारखेला पहिल्यांदा बारसूला जणार त्यानंतर महाडच्या सभेला जाणार", असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमीका मांडली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT