Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंनी सांगितला शिवसेनाप्रमुखांचा 'तो' किस्सा ; बाळासाहेब माझ्यावर चिडले...

Balasaheb Thackeray News : बाळासाहेबांना मी सांगितले, जरा थांबा माझे ऐका..

Mangesh Mahale

Mumbai : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅस सिलेंडरचा भाव दोनशे रुपयांनी कमी केला आहे. याच मुद्दावरुन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधत 2012 चा किस्सा सांगितला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना नेमके का झापले होते? हे त्यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून त्यांनी नरेंद्र मोदी, आरएसएस, भाजपला लक्ष्य केले. (Latest Marathi News)

केंद्र सरकारने गणेशोत्सवातच संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे.त्यावर टीका करीत ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "२०१२ मध्ये भाजपाने गॅस सिलिंडरचे आंदोलन गणपतीच्या दिवसात केले होते. तेव्हा सुषमा स्वराज यांचा मला फोन केला. भारत बंद करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. मी बाळासाहेबांना विचारले, ते मला म्हणाले त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करीत नाही,"

"त्यावेळी माझी अँजिओप्लास्टी झाली होती. गणपतीच्या दिवसात भाजपने भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो. दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडर हातात घेतलेला माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. तो फोटो पाहून बाळासाहेबांनी मला झापले. 'अरे तुझी अँजिओप्लास्टी झाली आणि तू सिलिंडर कसा काय घेतलास हातात,' बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. त्यांना मी सांगितले, जरा थांबा माझे ऐका. तो थर्माकोलचा सिलिंडर होता. 'मग ठीक आहे,' असे बाळासाहेब म्हणाले.

ठाकरे म्हणाले, "आता मोदी सरकारने गॅस सिलिंडरची किंमत दोनशे रुपयांनी कमी केली आहे. मात्र त्या गॅसवर शिजवणार काय? भाजीपाला,डाळी महाग झाल्या आहेत. हेच भाजपाचे लोक 2012 मध्येही सिलिंडरच्या दरांविरोधात आंदोलन करत होते,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT