Ajit Pawar - Uddhav Thackeray
Ajit Pawar - Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar In Vajramuth Sabha: सभेत ठाकरेंना 'विशेष खुर्ची' ?, अजितदादांनी सांगितले कारण..

सरकारनामा ब्यूरो

Maha vikas Aghadi Vajramuth Sabha: महाविकास आघाडीची काल (रविवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा झाली. या सभा आघाडीच्या नेत्यांनी गाजवली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खूर्चीची चर्चा सध्या सुरु आहे.

या सभेत आघाडीच्या अन्य नेत्यांच्या खूर्चीपेक्षा ठाकरे यांनी खूर्ची वेगळी होती. यावरुन ठाकरे हे आता आघाडीची प्रमुख नेते झाले आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या प्रश्नाला राज्याचे विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्यासाठी विशेष खूर्ची व्यासपीठावर होती. यात अन्य कुठलाही उद्देश नव्हता," उद्धव ठाकरे यांची व्यासपीठावर शेवटी एन्ट्री झाली, तेव्हा फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. एकूणच कालच्या सभेने उद्धव ठाकरेंनाच आघाडीचा प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट केलं का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे, यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार म्हणाले, "या सभेसाठी काही धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षातील दोनच नेते बोलतील. त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक वडिलधारी, मान्यवर आहेत. त्यामुळे सर्वांनाच बोलायला मिळेल असे नाही.दोन तासांत सभा संपवायची असे आमचे नियोजन होते. शिवाय, राहुल गांधी सुरतला जाणार होते. त्यामुळे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात भाषण करून गेले. त्यामुळे यावर चर्चा करण्यासारखे काही नाही,"

"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे ठेवणीतले टोमणे होते. काय तर वज्रमूठ म्हणे वज्रमूठ नव्हे ही तर बोगसमूठ होती," असा खोचक टोला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, "ठेवणीतले टोमणे आणि तेच भाषण सर्वठिकाणी करायचे असेल तर कॅसेट लावायला हवी. अडीच वर्ष हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काय केले? मी हे केले ते सांगायला काही असले तर पाहिजे. इस्त्रायलमध्ये काय झाले हे सांगण्यापेक्षा आपल्याकडे काय केले ते सांगा. खोटे बोलण्याची एक मर्यादा असते. ती मर्यादा उद्धव ठाकरे यांनी सोडली आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT