Congress Save Democracy Rally: काँग्रेसच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना; अनेक नेते जखमी ; Video व्हायरल

Congress Rally: स्टेज अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.
Congress save democracy rally
Congress save democracy rally Sarkarnama
Published on
Updated on

Congress save democracy rally : छत्तीसगडमधील बिलासपूरमधून येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. काल (रविवारी) ही घटना घडली. स्टेज कोसळून झालेल्या या अपघातात अनेक नेत्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काँग्रेसकडून रविवारी ‘सेव्ह डेमोक्रसी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती झाल्याने हे स्टेज अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये अनेक काँग्रेस नेते स्टेजवर उभे असल्याचे दिसते. यावेळी ते 'लोकशाही वाचवा' च्या मोठमोठ्याने घोषणा देत आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांसह स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे. अचानक स्टेज कोसळल्याने सर्व जण खाली कोसळल्याचं दिसते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशभर आंदोलन, मोर्चा काढण्यात येत आहे. काँग्रेसकडून 'लोकशाही वाचवा'अभियान सुरु आहे. या अभियानात ही घटना झाली आहे.

Congress save democracy rally
Sanjay Raut Tweet : आर के लक्ष्मणांच्या व्यंगचित्रातून सत्ताधाऱ्यांवर राऊतांचे फटकारे

'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०२४ ची निवडणुक ते लढवू शकणार नाही.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com