Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On State : निवडणुका घ्या... गद्दारांना गाडायचंय; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : "पक्ष सोडून गेलेल्यांना माझा जय महाराष्ट्र !"

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना फुटल्यानंतर सुरू झालेली उद्धव ठाकरे गटातील गळती वर्षानंतरही कायम आहे. या महिन्याभरात ठाकरे गटातील मोठ्या शिलेदारांसह अनेक कार्यकर्त्यांनी 'बाळासाहेब भवना'ची वाट धरली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख जास्त काही बोलताना दिसत नाहीत, मात्र ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे, यामुळे पक्षात स्वच्छता होईन अशी मोजक्या शब्दात त्यांनी शनिवारी टोले लगावले आहेत. (Latest Political News)

मुंबई येथे भेटण्यासाठी आलेल्या सामान्य लोकांशी संवाद साधताना आपल्याला गद्दारांना गाडायचे आहे, असे आव्हानच ठाकरेंनी दिले. ते म्हणाले, "मिंधे आणि भाजपला सांगतो दर आठवड्याला एक माणूस फोडा, यामुळे खऱ्या शिवसेनेतील बिनकामाची माणसे बाहेर जातील. एक-एक माणूस फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या. आपली माणसे फुटत असल्याचे पाहून शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांना माझा जय महाराष्ट्र !"

ठाकरे गटाकडून मोठी पदे भूषवल्यानंतरही अनेक लोकांनी 'शिवसेना भवन' सोडून 'बाळासाहेब भवन'ची वाट धरल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ४० आमदार आणि १३ खासादारांनी झटक्यात साथ सोडल्यानंतर ठाकरे गटातील गळती सुरूच आहे. विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे, भूषण देसाई, माजी नगरसेवक मंगेश सातमकर आदी बड्या नेत्यांनी शिंदे गटात गेल्या काही महिन्यात शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर एक-एक माणून फोडण्यापेक्षा आता महानगरपालिकेची निवडणूकच घ्या, असे आव्हान ठाकरेंनी शिंदे-फडणीसांना दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT