Sambhaji Bhide Controversy : "संभाजी भिडेंना २४ तासांत अटक करा; अन्यथा.."

Sambhaji Bhide Controversial Statement : 'भिडेंना अटक केल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाहीत?'
Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आता राज्यभरात विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरू लागले आहेत. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. भिडेंना चोवीस तासांत अटक करा अन्यथा अधिक तीव्रपणे आंदोलने करू, असा इशारा विरोधकांनी दिला. यामुळे आता भिडेंविरोधात कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sambhaji Bhide Controversial)

याबाबत काँग्रेसच्या आमदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही भिंडेंच्या अटकेची मागणी केली आहे. ठाकूर म्हणाल्या, "समाजात अशांतता तयार करण्याचं काम संभाजी भिडे का करत आहेत. अशी वक्तव्य करूनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? संभाजी भिडे यांना एवढी मुभा का आहे? भिडेला २४ तासांत अटक झाली पाहिजे, नाहीतर अधिक तीव्रपणे आंदोलन करू"

दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी विधानसभेत केली होती. चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे या गृहस्थाने महात्मा गांधीबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तीला अटक करून, त्यांच्यावर कलम १५३ अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे. भिडे मागील अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचा काम करत आहेत."

भिडेंवर गुन्हा दाखल -

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना संभाजी भिंडेंनी गांधीबाबत वादग्रस्त विधान केले होते.संभाजी भिडे, निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्‍या इतरही आयोजकांवर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १५३ (३), ५००, ५०५(२), ३४ कलमांअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. महापुरूषांविरोधात वादग्रस्‍त वक्तव्ये करूणे, समाजात असंतोष पसरवणे, समाजातील विविध घटकांमध्ये तेढ घालणे, असे गुन्हे भिडेंवर नोंदवले गेले आहेत.

Sambhaji Bhide
Uddhav Thackeray News : तुम्ही रोज माझा माणूस फोडा, पण...; ठाण्यात पोहचण्याआधीच ठाकरेंनी सोडला 'वर्षा'च्या दिशेने बाण

संभाजी भिडे काय म्हणाले होते ?

"मोहनदास हे करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते. करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे काम करायचे आणि एक दिवस त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन ते पळून गेले. त्यामुळे चिडलेल्या त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या चौथ्या पत्नीला पळवून नेलं आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास गांधींचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार असल्याचे वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.