Mumbai Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटांनी एकमेकांविरोधात आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे.
ही नियमित सुनावणी असली तरी यातूनच या महासत्तासंघर्षाची पुढील दिशा ठरणार आहे. या सुनावणी सत्तासंघर्षप्रकरणी वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे. यामुळे ही सुनावणीमुळे राज्यातील सत्तासंघर्षाला योग्य दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारल्यानंतर राज्यातील महासत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय हलचालींना वेग आला आहे. सत्तासंघर्षाबाबत १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर सोमवारी दुपारी तीन वाजता दुसरी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीला दोन्ही गटांच्या आमदारांना उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यांच्या वतीने त्यांचे वकील बाजू मांडणार आहेत. यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत होत असलेल्या दिरंगाईची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून दिली. यानंतर नार्वेकरांनी दिल्लीतील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. यानंतर त्यांनी हे प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे संकेत दिलेले होते. त्यानुसारच सोमवारी दुपारी सुनावणी होत आहे. या वेळी या प्रकरणाबाबत पुढील सुनावणींचे वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, न्यायालयाने शिवसेना १६ आमदार अपात्रेबाबत 'योग्य मुदतीत' निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, सहा महिने उलटूनही विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही. यातून न्यायालय नाराजी व्यक्त करत अध्यक्षांना लवकर निर्णय घेण्यास सांगितले. यावर नार्वेकरांनी निर्णय घेण्यास विलंब लावणार नाही, पण त्यातही घाई करणार नाही, कारण त्याचा न्यायावर परिणाम होऊ शकतो, असा म्हटले. नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.