Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट!

Sharad Pawar : तीन दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. सद्या पवार यांच्यावरती ब्रीच कँडी (Brech Candy) रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही वेळातच उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानावरून निघणार आहेत. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. तीन दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पवारांना न्युमोनिया झाला असल्याचे कळते आहे.

डाँक्टरांच्या निगराणीखाला उपचार घेत आहेत. काल शरद पवार हे राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले होते. त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर ते पुन्हा ते ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शरद पवार यांना भेटून प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे हे सुद्धा भेट घेणार आहेत. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या तोंडावर आजार पडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते शिबिराला येणार की नाही, याची चर्चा रंगली होती.

मात्र, सर्वांचे अंदाज खोटे ठरवत पवार यांनी पक्षाच्या शिबिराच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली हेाती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT