Andheri Election Result मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरी निकाल समोर आला आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर असून त्यांना 4277 मते पडली आहेत. तर दूसऱ्या क्रमांकांची म्हणजे 622 मते नोटा पडल्याचे दिसत आहे.
भाजपने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नोटा ला मतदान करण्यासाठी प्रचार केला होता. पहिल्या फेरीचा निकाल पाहता तो काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने निवडणुकीआधीच मैदानातून पळ काढणाऱया विरोधकांकडून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते पडण्यासाठी ‘नोटा’चा प्रचार करण्यात आला होता.ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी आरोप होते. अंधेरीत (Andheri News) नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता.
भाजपचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांचा सामना केवळ अपक्ष उमेदवारांशी होता. पण तरीही भाजपकडून या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नोटांचा वापर हा नोटा पर्यायावर मतदान करण्यासाठी सुरु असल्याची माहिती आणि पुरावे आमच्याकडे आहेत, असा अनिल परब यांनी केला होता
इतकेच नव्हे तर, यासंबंधीचा एक ऑडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून लटकेंना मतदान न करता, नोटाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
तर विरोधकांकडून चिन्ह गोठवण्यापासून, लटकेंचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यापर्यंतचे प्रयत्न झाले. यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले. प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.