Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे घेणार घोसाळकर कुटुंबीयांची भेट

Abhishek Ghosalkar Firing Case: मेहुल पारीख यांनी काल रेकी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

Jui Jadhav

Mumbai News: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांचं पार्थिव 11 वाजता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.

शिवसेनेचे माजी नगरसेवक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याने दहिसर परिसर आणि शिवसैनिक हादरले आहेत. उद्धव ठाकरे हे नियोजित दौरा करणार होते. विविध शाखांना भेट देण्यासाठी ते जाणार होते. मात्र ही घटना घडल्यानंतर त्यांनी त्यांचे आजचे दौरे रद्द केले आहेत. ठाकरे गटातील इतर नेते देखील त्यांच्या सोबत दहिसरला जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा काळा दिवस आहे असं सांगितलं जात आहे. काल रात्रीपासून रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.

याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मॉरिसचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहू या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेहुल पारीख यांनी काल रेकी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

मॉरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता...

राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही महिन्याभारत गोळीबाराचे प्रकार वाढले आहेत. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!, अशी परखड प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT