Abhishek Ghosalkar Shot Dead : घोसाळकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; मॉरिसच्या पीएसह दोन जण ताब्यात

Abhishek Ghosalkar Death : मेहुल हा मॉरिसचा कट्टर समर्थक असून काल ही घटना होण्याच्या अगोदर त्याला माहिती होती
Corporation Abhishek Ghosalkar Death firing Mauris Noronha
Corporation Abhishek Ghosalkar Death firing Mauris Noronha Sarkarnama
Published on
Updated on

Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल (गुरुवारी) गोळीबार करण्यात आला. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मॉरिसचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहू या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेहुल पारीख यांनी काल रेकी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

दोघांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.

मेहुल हा मॉरिसचा कट्टर समर्थक असून काल ही घटना होण्याच्या अगोदर त्याला माहिती होती.ऑफिस बाहेर त्यांनी रेकी केली होती.एम.एच. बी.पोलिसांनी मेहुलसह रोहित साहू उर्फ रावण याला ताब्यात घेतले आहे. (Abhishek Ghosalkar Shot Dead)

Corporation Abhishek Ghosalkar Death firing Mauris Noronha
Jalna Lok Sabha: जालन्यात दानवेंच्या विरोधात कोण ? महाविकास आघाडीचा शोध संपेना...

मेहुल पारीख आणि रोहित साहू याच्याकडून पोलिसांनी 1 पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आज घोसाळकर कुटुंबियांच्या भेटीला उद्धव ठाकरे जाणार आहेत. अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांच्या जुन्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.

गुरुवारी संध्याकाळी मॉरिस नोव्हेका (Mauris Noronha) नावाच्या व्यक्तीने दहिसरचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकरांना फेसबूक लाइव्ह कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. मॉरिसने त्यांच्यासोबत फेसबूक लाइव्ह केले. यात दोन ते तीन वेळा तो त्यांच्यासोबतही लाइव्हमध्ये सहभागी झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लाइव्हचा कार्यक्रम संपत असताना अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) उठून बाहेर निघाले तेवढ्यात मॉरिसने समोरुन त्यांच्यावर एका पाठोपाठ एक पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com