Uddhav Thackeray, D.B.Patil Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : दशकभरात महाराष्ट्रावर अन्याय का? उद्धव ठाकरेंचा थेट मोदी सरकारवर निशाणा

Airport Naming issue in Maharashtra : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात दिरंगाई का? उद्धव ठाकरे यांचं ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र...

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव :

Mumbai News : नवी मुंबईतील विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगरमधील (तत्कालीन औरंगाबाद) विमानतळांच्या नामकरणासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नावांचे प्रस्ताव दिले होते. त्यावर कधी कार्यवाही करणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना शुक्रवारी (5 जानेवारी) पत्र लिहून उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

तत्कालीन औरंगाबादमधील विमानतळाला 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' नाव द्यावे आणि नवी मुंबईतील विमानतळाला 'श्री. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' यांचे नाव द्यावे, असे प्रस्ताव देऊनही केंद्र सरकारने अजून कार्यवाही केली नाही, या बद्दल उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दोन विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले होते. त्यातील औरंगाबादमधील विमानतळाला 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' नाव द्यावे हा प्रस्ताव २०२० मध्ये तर आणि नवी मुंबईतील विमानतळाला 'श्री. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' यांचे नाव द्यावे, .याचा प्रस्ताव २०२२ मध्ये केंद्राकडे पाठवला होता. परंतु, याबाबत केंद्राकडून काहीही न झाल्याने, विमानतळांची नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी, अशी विनंती ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

विशेष म्हणजे याच पत्रातून त्यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागतोय, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे. त्यामुळे पत्र जरी ज्योतिरादित्य शिंदे यांना लिहिलेले असले तरी लक्ष्य पंतप्रधान मोदींना केलेले आहे.

पत्राच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मीकी यांचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच गोव्यातील विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचवेळी यापूर्वी आपल्याला व्यक्तीच्या नावावरून नव्हे तर शहरांवरून विमानतळांचे नामकरण केले जात असल्याचे विविध स्तरांवरुन सांगितल्याचा दावा केला आहे. मग वरील दोन विमानतळांना लावलेला न्याय महाराष्ट्रातील विमानतळांना लागू होणार का? असा सवाल ठाकरेंनी ज्योतिरादित्य शिंदे यांना विचारला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांना ठावूक आहे आणि दि. बा. पाटील यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

(Edited Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT