मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखती दिली आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. (Uddhav Thackeray Latest Marathi News)
मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. शिवसेनेतून पालापाचोळा गेला आहे. पानझड झाल्यानंतर झाडाला नवीन पालवी फुटते. त्या प्रमाणे शिवसेनेला उभारी मिळेल. गेले ते पालापाचोळा आहेत, जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, बाळासाहेबांचे ठाण्यावर प्रेम होते. शिवसेनेचे पाहिला भगवा हा ठाण्यावर फडकला होता. त्याच ठाण्यातून उठाव झाला? त्यावर ठाकरे म्हणाले, जे गेले ते पालापाचोळा आहे. ठाण्यातील जनता आजही शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे का? यावर ठाकरे म्हणाले, सडलेली पाने झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळे काही मिळाले, रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती झाडाकडून सगळे घेऊनही गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसे झाले आहे हे दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. मात्र, दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि जातो. झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे, आता नवीन कोंब फुटायला लागले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.