Cm Uddhav Thackeray, Bhagatsingh Koshyari
Cm Uddhav Thackeray, Bhagatsingh Koshyari  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : राज्यपालांच्या नियुक्तीवरुन उद्धव ठाकरेंची टोलेबाजी..

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यभर निषेध करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) राज्यपालांवर निशाणा साधला.

बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले,"राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवले गेले पाहिजे. ऐरेगेरे या राज्यपालांच्या खूर्चीवर बसता कामा नये. आपल्या माणसाला या जागेवर बसवलं पाहिजे,"

"शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्यानंतर सत्ताधारी गप्प आहेत, आगामी काळात आपल्या स्वाभिमानासाठी मराठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक होत असतील तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरुन आल्यानंतर तिकडे का जात नाही? कर्नाटकने जतमध्ये पाणी सोडलं, त्या पाण्यात मुख्यमंत्री गंटागळ्या खात आहेत," असा टोला ठाकरे यांनी लगावला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

बेळगावसाठी नवस करायला का जात नाही ?

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी गुवाहाटीच्या कामाख्या देवीला नवस करण्यासाठी जातात, तर बेळगावसाठी नवस करायला का जात नाही ?," असा सवाल उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळी उपस्थित केला.

"अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार, अशी घोषणा मी केली होती. त्याही घोषणेला स्थगिती दिली असली तर माहिती नाही. सध्याचं सरकार मुंबईत कर्नाटक भवन बांधत असतील तर अवघड आहे," असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT