Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका; फडणवीसांचा घणाघात, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : बारसू रिफायनरी पूर्वी नाणारला होणार होती. तेथील १० हजार एकर जमीनीसाठी लोकांनी सहमती दिली होती. मात्र राजकारणासाठी खोटा प्रचार करून नाणार प्रकल्प हाणून पाडला. या रिफायनरीत तीन सरकारी कंपनींची गुंतवणूक आहे. ही पूर्णपणे ग्रीन प्रकल्प आहे. यामुळे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे राज्यासह देशाला फायदा होईल.

रिफायनारील राजकारणासाठी विरोध केला जात आहे. नाणारनंतर त्यांनीच केंद्र सरकारला पत्र लिहून प्रकल्पासाठी बारसू येथील जागा सूचविली होती. आताही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रकल्पासाठी योग्य जागा सांगावी. कोकणात होणाऱ्या रिफायनरीबाबत ठाकरे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बारसू रिफायनरीवरून टीका केली. फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातच बारसू येथे रिफायनरी करण्याचा ठरले होते, मग आता त्यास विरोध का केला जात आहे.? विरोध करणारे थोडे लोक आहेत. त्यांची संख्या मोठी नाही. ठाकरे यांनी आरे, वाढवण बंदर, समृद्ध महामार्गालाही विरोध केला होता. कुठलाही प्रकल्प आला तर विरोध करायचा हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे."

बारसू परिसरात काही लोक घातपात करण्याच्या तयारीत असल्याचेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, "आपल्या फायद्यासाठी निष्पाप लोकांना धारेवर धरण्याचे काम सुरू आहे. येथे काही लोक जाणीवपूर्वक अप्रिय घटना घडविण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे रिफायनरी परिसरात कलम १४४ लागू केले आहे. आता तेथे बोअर घेतल्यानंतरच रिफायनरीसाठी जागा योग्य आहे की नाही हे ठरेल."

राज्य सरकारने रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाची घोषणा केली, त्यावेळेपासून स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. आता या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी शेकडो अधिकारी आणि १८०० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली आहे. 'एसआरपीएफ'च्या तीन तुकड्या रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिक पोलिसांचे पथके बोलवण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT