APMC Election : ...म्हणून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, आता बाजार समित्या आमच्याच !

Dr. Rajendra Shingne : दडपशाहीच्या राजकारणाला सणसणीत चपराक देईल.
Dr. Rajendra Shingne, Rahul Bondre and Jalindhar Budhwat.
Dr. Rajendra Shingne, Rahul Bondre and Jalindhar Budhwat.Sarkarnama

Buldhana District APMC Elections : केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा परिणाम आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत निश्चितच दिसेल. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देऊन महागाई, बेरोजगारी, दडपशाहीच्या राजकारणाला सणसणीत चपराक देईल, असे डॉ. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार शिंगणे यांनी म्हणाले. (The impact of the anti-farmer policies will definitely be seen in the upcoming market committee elections)

बुलढाणा जिल्ह्यातील १० बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्रितरीत्या लढवून विजय मिळवेल. महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आमचाच होणार, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १३ पैकी बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर या १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समावेश आहे.

देशातील व राज्यातील राजकारणाची परिस्थिती सर्वसामान्य जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. सातत्याने दडपशाही दंडुकेशाही व द्वेशाचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात तर भाजपने सत्तेसाठी वाटेल ते करून सर्वसामान्य जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. वाढती महागाई व शेतमालाचे घसरलेले भाव, यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Dr. Rajendra Shingne, Rahul Bondre and Jalindhar Budhwat.
Amravati APMC Election: प्रहारसोबत जाण्यास वरिष्ठांची मनाई, अमरावती बाजार समितीत ठाकरे गटाची परीक्षा !

जिल्ह्यातील १० बाजार समितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत. निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी आपला राज्य सरकार विरोधातील रोष निश्चितच प्रगट करेल व आमचा विजय सोपा होईल. याशिवाय बाजार समितीमध्ये आपल्या कार्यकाळात झालेले विकास कामे सर्वसामान्य मतदार निश्चित लक्षात घेईल, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.

बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही एकत्रित निवडणुका लढत आहोत. सध्याचे शेतकरी हिताच्या विरोधातील सरकार कोणतीही समस्या सोडवायला तयार नाही.

Dr. Rajendra Shingne, Rahul Bondre and Jalindhar Budhwat.
Ramtek APMC Election : राज्यात एक असलेली भाजप-शिवसेना रामटेकमध्ये आमनेसामने, केदारांशी टक्कर !

शेतीमालाचे सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू यांचे दर पाहून 'शासनाचे (State Government) धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे (Farmers) मरण’, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) निश्चितपणे साथ देईल, असे जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com