Uddhav Thackeray, Bbhagatsingh Koshyari Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा माजी राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल; म्हणाले, "भाडोत्री..."

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Attack On Bhagatsingh Koshyari : मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. ते सर्व पैसे पालिकेच्या तिजोरीत आणणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यानुसार सध्या ठाकरे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

मुंबई येथे शनिवारी (ता. २४) शिवसेना ठाकरे गटाचा पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मेळावा पार पडला. ठाकरे गट मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. त्या अनुषंगाने तयारी आणि मार्गदर्शनासाठी आजच्या मेळाव्याचे नियोजन होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी माजी राज्यपाल यांच्यावरही निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "कोविड काळात राज्यात एक भाडोत्री राज्यपाल बसले होते. आम्ही जे निर्णय घेत होतो, त्याला ख्वोडा घालण्याचे काम त्यांनी रितसरपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला पत्र लिहिले होते तुम्हाला काय साक्षात्कार होतो का, मंदिरे उघडण्यासाठी दाबाव आणला जात होता. मी मात्र साथ लक्षात घेऊन मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतला."

ठाकरे यांनी फडणवीस यांच्या आरोपांचा तीव्र शब्दात समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, "कोविड काळात एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नाही. त्यामुळेच नागरिकांचे प्राण वाचवता आहे. परराज्यातील मजुरांची त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोय केली. सीमा भागात सुमारे ७ लाख मजुरांची महिनाभर छावण्याच्या माध्यमातून सोय केली. त्यांनीही आपल्या सरकराचे कौतुक केले. भाजपवाले मात्र बिनबुडाचे आरोप करत आहेत. रेल्वे फ्लॅटफॉर्मवरील गर्दीत स्वतः चोरी करायची आणि चोर चोर म्हणून ओरडायचे आणि पसार व्हायचे. तसे भाजपचे झाले आहे. स्वतः ढिगभर घोटाळे करून ठेवले आहेत. संजय राऊत यांनी ईडीकडे त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यावर काही होणार नाही, झाले तरी त्यांनी क्लिनचीट दिली जाईल."

सध्या आपल्या नगरसेवकांवर दाबव आणला जात असल्याचाही आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, चार दिवसांपूर्वी माजी नगरसेवकांची बैठक झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी त्यांना पोलिसांकडून सतत बोलावणे येत असल्याचे समजले. त्या पोलीस अधिकाऱ्याला काय सांगायचे ते सांगितले आहे. असे असताना आपल्यातीलच काही बाजारबुणगे दुसऱ्यांचे काम करत आहेत. त्यांनी तिकडे जावे, कशाला थांबता येथे. त्यांच्याकडे खोके असतील मात्र जनतेची धनदौलत आपल्याकडे आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT