Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi News Sarkarnama
मुंबई

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पा बाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : मुंबई : राज्यातील राजकारण वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये दसरा मेळाव्यासंदर्भातही ठाकरेंनी महत्त्वाचे आदेश दिले. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशात दसरा मेळाव्यासाठी तयारीला लागा असे आदेश ठाकरे यांनी आजच्या बैठकीत दिले आहे.

यावेळी ते म्हणाले, वेदांना प्रकल्प दोन महिन्यात गुजरातला गेलाच कसा? गुजरात, महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला त्यावेळी राज्य सरकार काय करत होते, असा सवाल त्यांनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मोठे नुकसान झाले. आम्ही हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले होते, असेही ठाकरे यांनी सांगितले.

आत्ताचे सत्ताधारी प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल आम्हाला दोष देत आहेत. मात्र, त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे, असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 'शिवसंवाद' यात्रेतही प्रकल्पावरुन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता. हा प्रकल्प गुजरातला गेला तरी यांना माहितही नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT