Ajit Pawar : आम्ही सत्तेत असतो तर वेदांता प्रकल्प गुजरातला जावू दिला नसता..

वेदांता, फॉक्सन हे दोन्ही प्रकल्प गुजरातला गेले कसे हे जनतेलाही माहिती असुन या दोन्ही प्रकल्पातुन राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. (Ajit Pawar)
Ajit Pawar News, Beed
Ajit Pawar News, BeedSarkarnama
Published on
Updated on

बीड : वेदांता प्रकल्पासाठी तळेगावची (जि. पुणे) जागा उपयुक्त होती. कुशल मनुष्यबळ असतांनाही हा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये हलविल्याने महाराष्ट्रातील दोन लाख सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताचे काम राज्यकर्त्यांनी हिसकावुन घेतल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. वेदांता गुजरातला हलविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा असून हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप करत आम्ही सत्तेत असतो तर हा प्रकल्प इतरत्र हलवू दिला नसता असा दावाही पवार यांनी केला.

कार्यक्रमांसाठी माजलगावला आलेले पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Beed) अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामचा कार्यक्रम औरंगाबाद, मुंबई येथे न घेता हैद्राबाद येथे घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी (Marathwada) मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन, स्मरण करणे गरजेचे असुन सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शेतक-यांच्या विमा प्रश्नावरही शासनाचे दुर्लक्ष असुन विमा कंपनी क्लिष्ट निर्माण करत आहे. काही भागातील शेतक-यांच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. शेतक-यांचे नुकसान झालेले असुन शेतक-यांना पिकविमा, आर्थिक मदत झाली पाहिजे. इतर राज्यामध्ये हजारो जनावरे आजारी असुन राज्यामध्ये लम्पी संसर्ग रोखण्यासाठी तातडीने लसिकरण करावे, लस उपलब्ध होत नसेल तर परदेशातून मागवावी.

Ajit Pawar News, Beed
Shivsena : भुमरेंची सटकली, म्हणाले खैरेंचे डोके गोमूत्राने स्वच्छ करा..

बेरोजगारी, महागाई यावर न बोलता इतर गोष्टीवर लक्ष दिले जात आहे. वेदांता, फॉक्सन हे दोन्ही प्रकल्प गुजरातला गेले कसे हे जनतेलाही माहिती असुन या दोन्ही प्रकल्पातुन राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. यामुळे राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा समोर येत आहे.

राज्यातील सरकार स्थगिती सरकार आहे. राज्यामध्ये सरकार स्थापन होवून तीन महिण्याचा कालावधी उलटला आहे. तरी देखिल पालकमंत्री नेमले नाहीत. परिणामी अनेक कामे रखडली आहेत. सरकारे येतात जातात परंतु सध्या ज्याप्रकारे प्रत्येक गोष्टीला स्थगिती मिळत आहे, त्यावरून राज्यातील सरकार स्थगिती सरकार असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com