Uddhav Thackeray and Narendra Modi  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : ''शेतकऱ्यांसाठी काय केलं ते शेतकरी आणि शरद पवार बघतील, पण तुम्ही...'' उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा !

Uddhav Thackeray and Narendra Modi : ''एखाद्याला तू नालायक आहेस, हे म्हणणं सोपं असतं. पण ...'' असंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Thackeray, Pawar, Modi News : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील जाहीर सभेत बोलताना केला. मोदींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामधून विविध प्रतिक्रियाही उमटल्या, राष्ट्रवादीकडूनही मोदींना प्रत्युत्तर दिलं गेलं, तर काहींनी अजित पवारांवरही निशाणा साधला. दरम्यान, आज शिवेसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या या विधानावरून लक्ष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्येष्ठ शिवसैनिक मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, ''पंतप्रधान मोदी शिर्डीत येऊन गेले. गंमत बघा कशी आहे, अजित पवार तिकडे जाण्याअगोदर त्यांनी राष्ट्रवादीवर काय आरोप केले होते, की ७० हजार कोटींचा घोटाळा केला. त्यानंतर परवा जेव्हा आले तेव्हा बाजूला अजित पवार, तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा गायब. कारण, करणार कोणावर आरोप बाजूलाच बसलाय. मग काय केलं, तर यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं, ते शेतकरी आणि शरद पवार बघतील, पण तुम्ही काय केलंत.''

याचबरोबर ''उत्तरेकडचे शेतकरी वर्षभर थंडी, वारा, पावसात रस्त्यावर का बसले होते? का त्यांचे जीव घालवले तुम्ही? त्यानंतर तो काळा कायदा मागे का घेतला? त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत होता आणि त्यांना चिरडत होता, हेही पहिल्यांदा तुम्ही सांगा.'' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

याशिवाय ''काही काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात, व्ही. पी. सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं एक उत्तर मला अजूनही लक्षात आहे. की एखाद्याला तू नालायक आहेस हे म्हणणं सोपं असतं, पण त्याचबरोबर मी किती लायक आहे हे सांगण्याची गरज असते. हे मी एकूण सामान्य माणसाबाबत बोलतो आहे, की टीका करताना आपण काय केले ते सांगा.

तसेच काेरोना काळातील कारभाराची चौकशी जरूर करा, माझं तर आव्हान आहे कराच. पण काेरोना काळात मुंबईने काय केलं, त्याचीसुद्धा तुलना इतर राज्यांनी काय केलं, त्याच्याबरोबर करा,'' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना एकप्रकारे प्रत्युत्तरच दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT