Modi Vs Pawar : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? मोदींचा पुन्हा तोच सवाल!

PM Modi News : ''त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ...'' असंही मोदींनी पवारांबद्दल म्हटलं आहे.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi in Shirdi : ''आम्ही शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत. मात्र, काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नावाने केवळ आणि केवळ राजकारण केलं.'' असं म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांच्या नावाचा उल्लेख न करत त्यांच्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
PM Modi Shirdi Visit : शिर्डीत मोदींना भेट दिलेला मंगलकलश, तलवारीची वैशिष्ट्ये माहिती आहेत का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन आणि डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित केले. या वेळी मोदींनी उपस्थित शेतकऱ्यांना केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे काम करत आहे याबाबत माहिती दिली. शिवाय २०१४ अगोदर शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामारे जावे लागायचे आणि आता परिस्थिती कशी बदलली आहे हेही बोलून दाखवले.

शरद पवारांवर नाव न घेता टीका करताना मोदी म्हणाले, ''महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषिमंत्री होते. तसा तर वैयक्तिकदृष्ट्या मी त्यांचा सन्मानही करतो, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ हा आकडा लक्षात ठेवा, सात वर्षांत देशभरातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख रुपये कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले, तर आमच्या सरकारने सात वर्षांत एमएसपीच्या रूपात एवढ्याच कालावधीत साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.''

PM Modi
#shorts | मुख्यमंत्री शिंदेंचा इंडियावर हल्लाबोल | CM Eknath Shinde on INDIA |

याशिवाय ''जेव्हा ते कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या पैशांसाठीही मध्यस्तांच्या भरवशावर राहावे लागत होते. महिनोंमहिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची व्यवस्था केली,'' असंही मोदींनी या वेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com