Ulhasnagar News Sarkarnama
मुंबई

Ulhasnagar News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर शिपायानेच केला जादूटोणा? गुन्हा दाखल, कारच्या चाकाखाली लिंबू...

Mangesh Mahale

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्तांवर जादूटोणा करण्यासाठी त्यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी पालिकेच्या चार्जिंग स्टेशनवरील धनंजय गायकवाड या शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे. मध्यवर्ती पोलिस ठाणे अधिक तपास करीत आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत सहायक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्यपदी कार्यरत असलेले मनीष हिवरे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिरवे हे उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागे असलेल्या महापालिकेच्या चार्जिंग स्टेशनसमोर त्यांची कार उभी करतात.

गेल्या ११ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता हिवरे हे चार्जिंग स्टेशनजवळील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात बसले असता, त्यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना एका कर्मचाऱ्याने दिली.

हिरवे यांनी १२ तारखेला सीसीटीव्ही तपासले असता नागरी सुविधा केंद्रातील शिपाई धनंजय गायकवाड याने हे कृत्य केले असल्याचे दिसले. हिवरे यांनी हा प्रकार आयुक्त अजिज शेख यांना सांगितल्यावर शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याच्या सूचना दिली. त्यानंतर हिवरे यांनी मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून गायकवाड याच्याविरोधात तक्रार दिली आहे. गायकवाड याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT