Navi Mumbai NCP News
Navi Mumbai NCP News Sarkarnama

Navi Mumbai News : राष्ट्रवादी नेत्याच्या भावावर खंडणीचा गुन्हा; बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलची तोडफोड

Navi Mumbai NCP News : बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलची तोडफोड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Published on

Navi Mumbai : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या भावाने हॉटेल कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईतील पाम बीच गॅलरिया मॉलमधील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Navi Mumbai NCP News
Manoj Jarange Rally : राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, "जरांगेंची मागणीच चुकीची"

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे याच्या भावाची गुंडगिरी समोर आली आहे. राहुल आंग्रे असे त्यांचे नाव आहे. राहुल याने आपल्या साथीदारांसह हॉटेल कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलची तोडफोड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. एका आरोपीस अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. आतापर्यंत एपीएमसी पोलिसांनी तीन वेळा उत्पादन शुल्क विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिकेस पत्र लिहून येथील हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पहाटेपर्यंत चालणाऱ्या अशा पबमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Navi Mumbai NCP News
Manoj Jarange Rally : भुजबळ, त्यांची समता परिषद चिल्लर, त्यांना काही उद्योग नाही; जरांगे आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com