Dhananjay Bodare Nilesh Bobde sarkarnama
मुंबई

Ulhasnagar Politics : एकाच प्रभागात सहा नगरसेवक; दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड! शिवसेनेसोबत भाजपचेही विशेष लक्ष

Dhananjay Bodare Nilesh Bobde : प्रभाग क्रमांक १५ मधील चारही जागांवर शिवसेनेचे नगरसेवक जनतेच्या मतदानातून निवडून आले होते. आता त्यामध्ये आणखी दोघांची भर पडली आहे.

सरकारनामा ब्यूरो

नवनीत बऱ्हाटे

Ulhasnagar News : चार नगरसेवकांच्या जोडीला आता आणखी दोन स्वीकृत सदस्यांचे बळ मिळाल्याने उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक १५ चे महापालिकेतील राजकीय वजन वाढले आहे. भाजपचे धनंजय बोडारे आणि शिवसेनेचे निलेश बोबडे यांच्या निवडीमुळे प्रभागाशी संबंधित सदस्य संख्या सहावर पोहोचली आहे. आता ही वाढीव ताकद नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती उपयोगी ठरणार आणि विकासकामांना गती देणार का, याची कसोटी लागणार आहे.

महापालिकेच्या सात स्वीकृत सदस्यांची निवड गुरुवारी सायंकाळी सभागृहात पार पडली. महापौर अश्विनी निकम यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. सात जागांपैकी शिवसेनेच्या पाच, तर भाजपच्या दोन सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपाचे धनंजय बोडारे आणि शिवसेनेचे निलेश बोबडे यांना स्थान मिळाले.

जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. प्रभाग क्रमांक १५ मधील चारही जागांवर शिवसेनेचे नगरसेवक जनतेच्या मतदानातून निवडून आले होते. आता याच प्रभागातील दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याने चार निर्वाचित नगरसेवकांसोबत आणखी दोन सदस्यांची जोड मिळाली आहे.

स्वीकृत सदस्यांची नियुक्ती महापालिका स्तरावर झाली असल्याने प्रभागाच्या चार निर्वाचित जागांच्या रचनेत बदल झालेला नाही. मात्र, प्रभागाशी संबंधित सहा सदस्य सभागृहात असल्याने स्थानिक प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिक बळ उपलब्ध झाले आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर हे सदस्य किती समन्वयाने काम करतात, याकडे लक्ष राहणार आहे. वाढलेल्या संख्याबळाचे रूपांतर ठोस विकासकामांत करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी सर्व सहा सदस्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT