नवनीत बऱ्हाटे
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेत तीन महासभांसाठी निलंबित असतानाही विशेष महासभेत उपस्थित राहिलेल्या भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश महापौर अश्विनी निकम यांनी दिल्याने सभागृहात गोंधळ उडाला. महापौरांच्या या भूमिकेमुळे स्वीकृत नगरसेवक निवडीच्या सभेत पुन्हा राजकीय संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले.
महापौर अश्विनी निकम यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना यापूर्वी तीन महासभांसाठी निलंबित करण्यात आले होते. तरी देखील गुरुवारी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आयोजित विशेष महासभेला प्रधान पाटील उपस्थित राहिले.
त्यांच्या उपस्थितीचे निदर्शनास येताच महापौरांनी सुरक्षा रक्षकांना त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहाबाहेर जाताना पाटील यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची भूमिका स्पष्ट केली.
“शहराच्या भल्यासाठी मी सभागृहाबाहेर जात आहे. या निर्णयाला मी न्यायालयात आव्हान देणार असून, मी पुन्हा सभागृहात येईन,” असे पाटील यांनी सांगितले. स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत घडलेल्या या घटनेने शिवसेना आणि महापौर यांच्यातील वाद पुन्हा समोर आला असून, महापालिकेतील राजकीय तणावही अधोरेखित झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.