Maharashtra Cabinet Expansion Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहूर्तावरच काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता? मंत्रिपदाचा त्याग करावा लागण्याची शक्यता

महेश जगताप

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनंही मिळाली आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. असं असलं तरी गेल्या एक वर्षभरापासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एक ते दोन दिवसात होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

असं असतानाच भाजप आणि शिंदे गटातील काही मंत्र्यांची मात्र, धाकधूक वाढली आहे. भाजमधील दोन ते तीन मंत्र्यांना मंत्रीपद सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे. तर काही मंत्र्यांची महत्वाची खाती अजित पवार यांच्या गटाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच प्रकारे शिंदे गटातील मंत्र्यांना देखील काही महत्वाच्या खाते सोडावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षात काही मंत्र्यांना मंत्रिपदाचा करावा लागणारा त्याग आणि खातेबदलामुळे काही मंत्र्यांमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहर्तावरच अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपला नंबर लागेल या आशेने शिंदे गटासोबत भाजपचे नेतेही देव पाण्यात घालून बसले होते.

पण, गेल्या आठवड्यात बदललेल्या राजकीय समिकरणामुळे आपला नंबर लागेल की नाही, याची आता कोणालाच खात्री वाटत नाही. त्यामुळे किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री करायचे? याचे गणित देखील शिंदे-फडणवीस-पवार यांच्यासमोर असणार आहे.

दरम्यान, आठ दिवस झाले तरी देखील राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना अद्याप खाते मिळालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवरच या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर या सरकारची तारेवरची कसरत असणार आहे. हे तिघे कसा तोल सांभाळतील हे त्यातून दिसणार आहे. त्याचबरोबर विद्यमान मंत्र्यांची मंत्रीपद, खातेबदल करतांना यांची नाराजी कशी हाताळली जाते? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

या मंत्र्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता?

भाजपमधील मंगलप्रभात लोढा (महिला बालविकास व पर्यटन मंत्री), अतुल सावे (सहकार मंत्री), सुरेश खाडे (कामगार मंत्री), तर शिंदे गटातील तानाजी सावंत (आरोग्यमंत्री), संदीपान भुमरे (रोजगार हमी योजना व फलोउत्पादन), संजय राठोड (अन्न व औषध प्रशासन मंत्री?, या मंत्र्यांच्या मंत्रीपदात बदल होण्याची वर्तवण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT