Ujjwal Nikam News: सबळ कारण दिले तर आमदारांना मुदतवाढ देण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार..

Marathwada News: शिंदे गट म्हणणे मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे मुदतवाढ मागू शकतो.
Adv. Ujjwal Nikam News
Adv. Ujjwal Nikam NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna : आमदारांच्या निलंबन प्रक्रियेत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडूनही अशी मागणी करण्यात आली आहे. सबळ कारण दिल्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय हा अध्यक्षांचा असल्याचे मत कायदे तज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

Adv. Ujjwal Nikam News
Asaduddin Owaisi News : समान नागरी कायदा मुस्लिमांसाठीच नाही, इतरांसाठीही धोकादायक..

जालना जिल्हा व सत्र न्यायालयात ऍड. उज्ज्वल निकम हे संगीता लाहोटी खून प्रकरणी फिर्यादीकडून बाजू मांडण्यासाठी आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Jalna) आमदारांच्या निलंबना संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट व ठाकरे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना राजकीय पक्षांच्या घटनेचा विचार करून विधान सभेत राजकीय पक्ष कोण आहे आणि राजकीय व्हीप नेमला आहे की नाही ? याची चौकशी करून निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. (Marathwada) त्यामुळे आमदारांना सात दिवसांची मुदत दिली असून ही मुदतवाढ अध्यक्ष देणार की नाही हे पहावे लागेल.

परंतु, माध्यमांना ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, त्यानुसार शिंदे गट म्हणणे मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे मुदतवाढ मागू शकतो. मात्र, यासाठी सबळ कारण दिले तर विधानसभा अध्यक्ष त्यांच्या अधिकारात आमदारांना म्हणने मांडण्यासाठी मुदतवाढ देऊ शकतात, असे मत ऍड. निकम यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com